अहमदनगर: जिल्ह्यातील बारा विधिज्ज्ञ असलेल्या विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. नवनिर्वाचित न्यायाधीशांचा साईव्दारका ट्रस्ट व आय लव्ह नगरच्यावतीने आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला.
मनमाड रोडवरील मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित न्यायाधीशांसह त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी आय लव्ह नगरचे संस्थापक, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, साईव्दारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. धनंजय जाधव, अमित मुथा, दत्ता गाडळकर, जयश्री विजय औटी, जिल्हा उपनिबधंक दिग्विजय आहेर, किरण भंडारी, डॉ. अनिल आठरे, ॲड. गणेश शिरसाठ, संदीप देसर्डा आदी उपस्थित होते. जिल्ह्यातून शैलेश सातभाई, प्रवीण सागडे, हर्षदा अदमाने, दीपाली भंडारी, गौरी औटी, प्राची पालवे, सतीश वाकचौरे, प्रतीक सबडे, अश्विनी काळे, विष्णू गिते, प्रियंका काजळे, मोमीन हनीफ हे न्यायाधीश झाले आहेत. त्यांचा सत्कार करण्यात आला. आदी न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रोहित पवार म्हणाले, शेतकरी व कष्टकऱ्यांची मुले न्यायाधीश पदावर पाहून मनाला आनंद झाला. नोकरीबरोबरच आपण इतर व्यवसायातून जनतेची सेवा करू शकतो. कष्टातूनच स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. मुला-मुलींच्या स्वप्नावर आई-वडिलांनी विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने न्यायाधीश झाले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, धनंजय जाधव, ॲड. गणेश शिरसाठ आदींची भाषणे झाली.
...
सूचना फोटो आहे.