आॅनलाइन लोकमतनवनाथ खराडे / अहमदनगर, दि़ १९ - राज्यभरात सर्वाधिक बीपीएलधारक (दारिद्रयरेषेखालील) कुटुंब संख्येच्या बाबतीत नाशिक जिल्हा अग्रस्थानी असून, त्या खालोखाल नगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नगरमधील बीपीएलधारक कुटुंबांची संख्या निम्म्याने घटली आहे. संख्या निम्म्याने घटूनही जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. राज्यभरात सर्वांत कमी बीपीएलधारक वर्धा जिल्ह्यात आहेत. २०१६-१७ च्या वर्षाच्या आकडेवारीनुसार नाशिक पहिल्या, तर नगर दुसऱ्या स्थानी आहे. तर २०१५-१६ च्या आकडेवारीनुसार बीपीएलधारक कुटुंबांच्या नगर राज्यात पहिल्या स्थानी, तर नाशिक दुसऱ्या क्रमांकांवर होते. राज्य शासनाच्या २०१५-१६ या वर्षातील आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार राज्यभरात सर्वाधिक ७ लाख बीपीएलधारक कुटुंबे नगर जिल्ह्यात होते. त्यामधून यंदा तब्बल ३ लाख बीपीएलधारक कमी झाले आहेत. २०१६-१७ वर्षाच्या आकडेवारीनुसार राज्यभरात सर्वाधिक बीपीएलधारकांची संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाशिकमध्ये बीपीएलधारक कुटुंबांची संख्या वाढली आहे. सद्य:स्थितीत नाशिकमध्ये ४ लाख ८४ हजार १७९ बीपीएलधारक, तर ६ लाख ९६ हजार ८५५ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. एकूण १२ लाख ६५ हजार ८३ शिधापत्रिका धारक नाशिक जिल्ह्यात आहेत. नगरमध्ये २०१५-१६ वर्षात १० लाख ५८ हजार ५९० कुटुंबाकडे शिधापत्रिका होत्या. त्यामधील ७ लाख कुटुंबांकडे बीपीएल शिधापत्रिका होती. ३ लाख कुटुंबांकडे केशरी, ५१ हजार कुटुंबाकडे पांढऱ्या शिधापत्रिका होत्या. मात्र नुकत्याच २०१६-१७ च्या वर्षात बीपीएलधारक कुटुंबांच्या संख्येत निम्म्याने घट झाली आहे. सद्य:स्थितीत बीपीएलधारक कुटुंबांची संख्या ३ लाख ८६ हजार १०, केशरी शिधापत्रिका कुटुंबांची संख्या ६ लाख ६६ हजार ३४२, तर पांढरी शिधापत्रिकाधारक ५२ हजार १४८ इतके आहेत. २०१५-१६ मधील ७ लाखांच्या तुलनेत २०१६-१७ या वर्षात जवळपास ३ लाखांच्या आसपास नगरमध्ये बीपीएलधारक कुटुंबांची संख्या कमी झाली आहे. बीपीएलची कमी झालेली संख्या केशरी कुटुंबात समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत ६ लाख ६६ हजार ३४२ कुटुंबांकडे केशरी शिधापत्रिका आहे. तसेच अन्नपूर्णा योजनेत १ हजार ६३८ कुटुंबांचा समावेश आहे. दोन वर्षांतील नगर जिल्ह्याची आकडेवारी२०१६-१७ बीपीएलधारक - ३ लाख ४८ हजार १०केशरी - ६ लाख ६६ हजार ३४२अन्नपुर्णी - १ हजार ६३८शुभ्र - ५२ हजार १४८एकूण - १० लाख ६८ हजार १३८२०१५-१६बीपीएलधारक - ७ लाखकेशरी - ३ लाखएकूण - १० लाख ५८ हजार
दारिद्र्यरेषेत नगर दुसऱ्या स्थानी
By admin | Published: April 19, 2017 12:35 PM