अहमदनगर : तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली घसरल्याने नगर शहर व जिल्हाही थंडीने गारठला आहे. शुक्रवारी व शनिवारी पहाटेपासून सर्वत्र धुके दाटून आले होते. दवबिंदुंचा वर्षाव झाल्याने गारठा अधिकच वाढला. शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने नगरला हुडहुडी भरली होती. रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविलेल्या दिसल्या. रविवारी सकाळीही थंडीचा परिणाम जाणवला. शुक्रवारी नोंदले गेलेले तापमानाही राज्यात नगरमध्ये निचांकी म्हणजे १०.६ अंश नोंदले गेले आहे. त्यानंतर तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली घसरला. शनिवारी मध्यरात्रीनंतर थंडी वाढली. शनिवारी थंडीमध्ये जास्त वाढ झाली. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दिवसभर उबदार कपड्यांचा आधार घेतला. दिवसभर ढगाळ हवामान असले तरी गार वारा सुटल्याने नगरकरांना हुडहुडी भरली होती. सध्याचे ढगाळ हवामान पिकांना नुकसान करणारे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. नगरचे तापमान आणखी घसरण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. थंडीमुळे सकाळी फिरायला येणाºयांच्या संख्येत घट झाली होती. अनेकांनी धुके आपापल्या मोबाईल कॅमे-यांमध्ये टिपले. पावसाची शक्यतापुणे वेधशाळेने ५ ते ८ जानेवारी या काळात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे वेधशाळेच्या दैनंदिन अहवालानुसार शुक्रवारी नोंदले गेलेले नगरचे तापमान राज्यातील निचांकी तापमान होते. ते १०.६ सेल्सिअस एवढे होते.
थंडीने नगर गारठले; पारा १० अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:07 PM