शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

नगरचे ‘कास पठार’ रंगीबेरंगी फुलांनी फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:18 AM

नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बिरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने  फुलांच्या भावात तेजी राहणार आहे.

योगेश गुंड अहमदनगर  : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बिरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने  फुलांच्या भावात तेजी राहणार आहे. येथील फुलांना देशभरातील बाजारातून मागणी असते.नवरात्र उत्सव आणि दसरा, दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणा-या अकोळनेर येथे फुलांचे मळे या सणांसाठी सज्ज झाले आहेत. अकोळनेरबरोबरच कामरगाव, भोरवाडी, चास, पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा, हंगा या ठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून या भागात फुलशेती केली जाते.एकट्या अकोळनेर गावातच जवळपास १०० एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्ड या नव्या प्रकारच्या शेवंतीची लागवड वाढली आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी, भाग्यश्री, पूजा  व्हाईट, सानिया यलो, ऐश्वर्या यासारखे शेवंतीचे प्रकार आहेत. साधारण मार्च  महिन्यात शेवंतीची लागवड करण्यात येते. यावर्षी पाऊस लांबल्याने फुलांच्या उत्पादनात ४० टक्के घटीची शक्यता आहे.पावसावरच बाजारभावाचे गणित यंदा कमी  पावसामुळे झेंडू-शेवंती या फुलांचे उत्पादन कमी होई. आवक घटणार असून त्याचा परिणाम फुलांच्या भाववाढीत होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चार पटीने वाढणार आहेत. शेवंतीचा भाव सध्या प्रती किलो २०० रूपये असला तरी सणासुदीत जास्त होईल, असा अंदाज आहे. झेंडूच्या भावाची अशीच स्थिती राहणार आहे.  झेंडू ७० रूपये प्रतिकिलो विकला जात आहे. चांगला पाऊस झाला तर ग्राहक व शेतकरी या दोघांना भाव परवडतील. पाऊस न झाल्यास  शेतक-यांची सगळी आर्थिक गणिते बिघडणार आहेत.विकतचे पाणी घेऊन फुले जगविलीयावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फुलांच्या उत्पादनात घट होणार आहे. शेतक-यांनी पदरमोड करून टॅँकरने पाणी देऊन फुले जगविली. एक एकर फुल शेतीसाठी आम्ही विकतचे १० हजार लिटर पाणी घेऊन देत आहोत. आमच्याकडे शेवंतीची १० हजार रोपांची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिल्याने त्यातील ७ हजार रोपे आम्ही काढून टाकली. फुलांची वाढ चांगली झाल्याने आता पावसाची गरज आहे, असे अकोळनेरचे फूल उत्पादक तुळशीदास जाधव यांनी सांगितले.     

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर