अहमदनगर : सार्वजनिक ठिकांणी थुंकल्यास, घाण केल्यास, लघुशंका केल्यास आता तुमच्यावर थेट कारवाई होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे एक पथक थेट तुमच्यावर वॉच ठेवणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, लघुशंका करणे तुम्हाला महागात पडू शकते.सोमवारी महापालिकेने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक हे सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. जर सार्वजनिक ठिकाणी घाण केली, थुंकले, लघुशंका केली, उघड्यावर शौच केली, प्लास्टिक व थर्माकॉलची हाताळणी केली तर महापालिकेचे स्वच्छता अधिकारी तुमच्यावर थेट कारवाई करणार आहेत. रस्त्यांवर घाण करणा-यांना १५० रुपये दंड, थुकल्यास १०० रुपये दंड, उघड्यावर लघुशंका केल्यास १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील रस्त्यावर घाण केल्यास १४५० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नगरकर सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे पडू शकते महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 2:11 PM