पाथर्डी : येथील फौजदारी न्यायालयाने टाकळी मानूर येथे शेतीच्या बांधावरून २०१२ मध्ये झालेल्या भाऊबंदांच्या मारहाणीच्या खटल्यात सहा आरोपींना सहा महिने कैद व नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.आसिफ मुसा शेख यांची टाकळीमानुर शिवारात शेती असून ते त्यांचे आई-वडील भाऊ-भावजय यांच्यासह टाकळीमानूर येथे राहतात. आसिफ शेख यांच्या शेता शेजारी त्यांचे चुलते रशीद बाबुलाल शेख यांची शेती असून दोघांच्या शेती दरम्यान सामायिक बांध आहे. १६ जून २०१२ रोजी सायंकाळी फियार्दी आसिफ शेख व आरोपी बशीर बाबुलाल शेख,समीर बशीर शेख,रशीद बाबुलाल शेख,शाकीर रशीद शेख,जाकीर रशीद शेख,इर्षाद शेख सर्व राहणार टाकळी मानूर यांची शेताच्या बांधावरून वाद झाला होता वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होऊन आरोपींनी फियार्दीला लोखंडी पाईपने डोक्यात व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती त्या मारहाणीत आसिफ शेख गंभीर जखमी झाले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी आसिफ शेख यांच्या फियार्दीवरून आरोपींविरुद्ध भादवि कलम ३२४ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.सदरचा खटला न्यायालयात सुनावणी आला असता सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ ज्योती पी. सरपाते यांनी वैद्यकीय अधिकारी यांनी जखमींचे वैद्यकीय प्रमाणपत्र व साक्ष तसेच पोलिसांनी गुन्ह्याचे कामी जप्त केलेले हत्यार लोखंडी पाइप यासह इतर साक्षीदारांच्या जबाब इत्यादी सबळ पुरावे ग्राह्य धरून सहाही आरोपींना सहा महिने साधी कैद व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे सरकार पक्षातर्फे अॅड.शिवाजीराव दराडे यांनी काम पाहिले. केवळ तीन हात जमिनीसाठी चुलता पुतण्यायांच्या दरम्यान झालेल्या मारहाणीमुळे चुलत्याला शिक्षा सुनावल्या मुळे हा खटला तालुक्यात चचेर्चा विषय बनला आहे.
बांधाचा वाद : सहा जणांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 5:30 PM