निघोज : पाटबंधारे विभागाने ‘माझा कालवा माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत कुकडी कालवा स्वच्छता अभियान सुरू केले आहे. पारनेर तालुक्यातील शिरसुले परिसरात या मोहिमेची सुरुवात आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाली. यावेळी सरपंच ठकाराम लंके, कुकडी उपविभागीय अधिकारी सुहास साळवे, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद, वसंत ढवण, शांताराम कळसकर, जितेश सरडे, ज्ञानेश्वर लंके, मंगेश लंके, विश्वासराव शेटे, सुनील वराळ, रोहिदास लामखडे, शाखाधिकारी सुनील दाते, आलीमभाई हवालदार, शांताराम लाळगे, माउली काळे, रवि काळे, दिगंबर लाळगे, सुरेश बेलोटे, अशोक बेल्हेकर आदी उपस्थित होते.
४१ ते ५५ किमी शिरसुले ते जवळापर्यंत १४ किमी कुकडी कालव्यामधील साचलेले दगड, माती बाहेर काढण्यात येणार आहे. प्रास्ताविक शाखाधिकारी सुनील दाते यांनी केले. मंगेश लंके यांनी आभार मानले.