अस्तगाव : राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर अमोल दत्तात्रय घोरपडे (वय २५) या तरूणाचा सोमवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या अमोलचा गुरूवार १९ एप्रिलला विवाह होणार होता. त्या आधीच काळाने त्याच्यावर झडप घातल्यामुळे या घटनेमुळे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली होती.शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टोल नाक्याजवळ याचठिकाणी महिन्यापूर्वी अस्तगाव येथील कैलास जेजूरकर यांचेही अपघाती निधन झाले होते. पिंपरी निर्मळ येथील अमोल घोरपडे लग्नाचे कपडे घेण्यासाठी सोमवारी नातेवाईकांसह नगरला गेला होता. बाभळेश्वरहून रात्री ११ च्या सुमारास दुचाकीवरुन येताना पिपंरी- निर्मळच्या टोल नाक्याजवळील गतीरोधकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदनानंतर घोरपडे वस्तीवर अंत्यसंस्कार पार पडले. पिंपरी निर्मळ ग्रामपंचायत सदस्य विष्णू घोरपडे यांचा तो पुतण्या होता. दरम्यान लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नातेवाईक, ग्रामस्थांनी टोलनाका बंद पाडलाअंत्यसंस्कारानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी टोलनाका बंद करीत आंदोलन केले.पिंपरी निर्मळ गावातील टोल नाक्यावर आजूबाजूला विजेचे दिवे आहेत. मात्र ते रात्री बंद असतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, स्पीड ब्रेकरला इंडिकेटर नाहीत, रात्री एकच लेन सुरू ठेवल्यामुळे वाहनांची प्रंचड गर्दी होते. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन नाही. याच कारणांमुळे याठिकाणी सतत अपघात होत आहेत. या बाबींची पूर्तता करण्याची मागणी करीत आंदोलकांनी टोलनाक्याच्या पर्यवेक्षकास घेराव घालून टोल वसुली बंद पाडली. यावेळी माजी सरपंच ज्ञानदेव घोरपडे, पंचायत समितीचे माजी सदस्य एन.टी.निर्मळ यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ हजर होते.
बोहल्यावर चढण्याआधीच पिंपरी निर्मळच्या तरूणावर काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 7:16 PM
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर अमोल दत्तात्रय घोरपडे (वय २५) या तरूणाचा सोमवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या अमोलचा गुरूवार १९ एप्रिलला विवाह होणार होता. त्या आधीच काळाने त्याच्यावर झडप घातल्यामुळे या घटनेमुळे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली होती.
ठळक मुद्देगुरूवारी होणार होता विवाहनातेवाईक, ग्रामस्थांनी टोलनाका बंद पाडला