अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यासह शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.अहमदनगर- मनमाड मार्गावर विळद घाट येथे, कल्याण - विशाखापट्टणम रोडवर कल्याण बायपासवर, औरंगाबाद- पुणे मार्गावरील केडगाव बायपासवर, अहमदनगर - दौंड मार्गावर अरणगाव येथे, अहमदनगर - सोलापूर मार्गावर वाळुंज बायपासवर, पाथर्डी रोडवर विजय लाईन येथे, औरंगाबाद मार्गावर शेंडी बायपासवर, बीड रोडवर निंबोडी येथे रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे.गांधी मैदानात किरकोळ दगडफेकसकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गांधी मैदानात किरकोळ दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एकास घेतले ताब्यात घेतले आहे. तसेच कापडबाजार बंद ठेवण्यात आला.अहमदनगर शहरात रॅलीनगर शहरातून दुचाकीवरुन रॅली काढण्यात आली. रॅलीमधील घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या रॅलीमध्य मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.राशीनमध्ये रास्तारोकोकर्जत तालुक्यातील राशीन येथे सकल मराठा संघटनेच्या वतीने औरंगाबाद येथील आंदोलककर्ते काकासाहेब शिंदे यांच्या शोकसभा व मराठा आरक्षण मागणी साठी रास्ता रोको ला सुरूवात सरकारचा निषेध आंदोलनात मोठमोठे टायर जाळुन निषेध आंदोलनात बहुसंख्येने मराठा व बहुजन सामिल.श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरमध्ये शाळा -कॉलेज बंदविसापूर (ता.श्रीगोंदा) परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी गावातील युवकांनी प्रभात फेरी काढली. व्यापा-यांना दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला. पारनेर आगाराची विसापूर-सुरेगाव मुक्कामी बस रात्रीच परत गेल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजला जाता आले नाही. विसापूरमधील शाळा व कॉलजही बंद आहेत.