श्रीगोंदा : श्रीगोंदा शहर परिसरात शुक्रवारी (२४ जुलै) ढगफुटी झाली. सरस्वती नदीला पूर आला. साळवण देवी रोडवरील सुधाकर रायकर यांच्या कुक्कुटपालनमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने २०० कोंबड्या वाहून गेल्या. एका अपार्टमेंटमधील २४ मोटारसायकली वाहून गेल्या आहेत.
श्रीगोंदा शहर परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजल्यानंतर मुसळधार पाऊस झाला. सरस्वती नदीला पूर आल्याने लेंडी नाल्याचे पाणी साळवण देवी रोड परिसरात घुसले. ओढ्याकाठी राहणाºया काही नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली.
दौंड-जामखेड रोडवरील रुक्मिणी बँकेशेजारी असलेल्या एका खताच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, श्री अपार्टमेंटमध्येही पुराचे पाणी घुसल्याने सुमारे २५ मोेटारसायकली वाहून गेल्या आहेत. श्रीगोंदा शहरात १०९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.