एनसीसीमध्ये विविध शिबिर, साहसी उपक्रम, सामाजिक उपक्रम, तसेच लष्करी व एनसीसी प्रशिक्षणामध्ये व शैक्षणिकदृष्ट्या अव्वल असणाऱ्या छात्रसैनिकांना दरवर्षी मुख्यमंत्री फंडामधून ही स्कॉलरशिप प्रधान केली जाते. दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी छात्रसैनिकांना मुख्यमंत्री स्कॉलरशिपचे चेक वितरित केले. या छात्रसैनिकांना मेजर संजय चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले. औरंगाबाद ग्रुपमधून व महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक १७ छात्रसैनिकांना ही स्कॉलरशिप मिळाली असून, त्यात सिनिअर अंडर ऑफिसर किरण गोरे, अंडर ऑफिसर तुषार जगताप, अंडर ऑफिसर गीता नेवसे, अंडर ऑफिसर अंजली शेटे, जालिंदर बावणे, विशाल बोडखे, प्रवीण फुंदे, शुभम घालमे, गजानन पखाले, महादेव खाडे, प्रतीक्षा बाबर, निकिता देशमुख, कल्याणी वाघमारे, तेजश्री गंगावणे, ज्योती चांदेकर, प्रीती जायभाय, नेहा ससाने यांचा समावेश आहे.
दादा पाटील महाविद्यालयातील छात्रसैनिकांना मुख्यमंत्री स्कॉलरशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:20 AM