शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
3
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
4
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
5
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

सहकारमहर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 3:03 PM

श्रीगोंदा तालुका मतदारसंघाचे आरक्षण दूर झाल्यानंतर खºया अर्थाने स्थानिक नेतृत्व पुढे आले. जनता पक्षाच्या लाटेत देखील मोहनराव गाडे यांचा पराभव करून बापूंनी १९७८ साली विधानसभेत प्रवेश केला. परंतु पुढे अडीच वर्षातच पुलोद सरकार कोसळले. १९८० मध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या व त्यामध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. पराभवाने खचून न जाता ते पुन्हा जोमाने कामाला लागले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने बापूंना पुन्हा निवडून दिले.तालुक्यामध्ये घोड व कुकडीचे पाणी फिरल्याने अनेक जिरायती गावांचे क्षेत्र बागायती बनले. हरितक्रांती झाली. शेतकºयांच्या शेतात विहिरी होत्या, परंतु  विजेचा प्रश्न भयानक होता. अशा परिस्थितीत स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्याकडे आग्रह धरून ऊर्जा मंत्री डॉ.बळीराम हिरे यांच्याकडून एकाच वेळी ४०००  कनेक्शन देऊन ऐतिहासिक काम बापूंनी केले. धवलक्रांतीच्या रूपाने तालुका दूध संघाची स्थापना केली. 

अहमदनगर : रूईगव्हाण (ता.कर्जत) येथे आजोळी १९ जानेवारी १९३४ रोजी माता पार्वतीबाई यांच्या उदरी शिवाजीराव नारायणराव नागवडे तथा बापू यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. श्रीगोंदा तालुक्याच्या एका टोकाला असणारे व घोडनदी तीरी वसलेले वांगदरी हे गाव. या गावामध्ये बालपण गेले. तेथेच बापूंनी प्राथमिक शिक्षण घेतले. गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने माळेगाव (ता.बारामती) येथे आत्याकडे राहून माध्यमिक शिक्षण घेतले. परंतु दुर्दैवाने आजोबा शंकरराव (तात्या) यांच्या निधनाने शिक्षण अर्ध्यावर सोडून बापू गावी परतले. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सहा बंधू व पाच बहिणी असे मोठे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी बापूंवर आली. हे करीत असताना १९५८ साली वरूर बुद्रूक (ता.शेवगाव) येथील तुकाराम मोरे यांच्या कन्या कौशल्यादेवी यांच्याशी बापूंचा विवाह झाला. स्वत:च्या गावी उत्तम प्रकारची शेती करीत असताना बापूंना दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांची हालअपेष्टा सहन झाली नाही. आपण  शेतकºयांसाठी काही तरी केले पाहिजे ही खूणगाठ उराशी बांधली. शेतीला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी पाण्याचा प्रश्न सोडविला पाहिजे त्याकरीता बापूंनी १९५२ च्या दुष्काळानंतर घोडच्या धरणाकरीता सर्व शेतकºयांना एकत्रित केले. विसापूर येथे स.का.पाटील, डॉ.दत्ता देशमुख यांच्या उपस्थितीत १९५३ साली पाणी परिषद घेतली. त्यावेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून घोड धरणाची मंजुरी मिळविण्यात शिवाजीराव नागवडे यशस्वी झाले. घोड धरण अस्तित्वात आल्यानंतर घोडच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात उसाची शेती फुलली. त्या उसाचे काय करायचे. हा विचार बापूंच्या मनात आला. त्यावेळी बेलवंडी येथे डहाणूकरांचा २५० टनी खाजगी साखर कारखाना होता. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर, कामगार, दीन दलित यांचे प्रपंच उभे करावयाचे असतील तर शेतकºयांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना असला पाहिजे, अशी तळमळ त्यांना होती. याकरीता त्यांनी डहाणूकरांशी संघर्ष करून लढा दिला. त्यांचा खाजगी साखर कारखाना विकत घेऊन तो सहकारी तत्त्वावर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. बाबूराव दादा तनपुरे व आबासाहेब निंबाळकर यांच्या मदतीने ‘विना सहकार, नही उद्धार’ चा नारा देत  शेतकºयांच्या मालकीचा नगरच्या दुष्काळी भागातील पहिला सहकारी साखर कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभा केला. यामध्ये शिवराम आण्णा पाचपुते, खासेराव काका वाबळे, डॉ.व्ही.डी.जगताप, रंगराव बाबा पंधरकर, रंगनाथ तात्या पंधरकर, आबासाहेब लगड, बाबूराव काका घाडगे, मोहनराव मोकाशी इत्यादी सहकाºयांना बरोबर घेतले. कधी सायकलवर तर कधी मोटारसायकलवर फिरून भाग भांडवल गोळा केले. श्रीगोंदा कारखाना उभारून यशस्वीरित्या चालविला. तालुक्यातील काही गावांना जरी घोडचे पाणी मिळाले तरी बरीचशी गावे पाण्यापासून वंचित होती. दुष्काळामध्ये होरपळत होती. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे बापूंना सारखे वाटे. ते कम्युनिस्ट पक्षात असताना त्यांनी सर्वपक्षीय नेते एकत्र करून मुळा व कुकडी धरणासाठी संघर्ष सुरू केला. त्यामध्ये डॉ.दत्ता देशमुख, बापूसाहेब भापकर, भाई सथ्था, अ‍ॅड. कानवडे, चंद्रकांत आठरे पाटील, उ.रा.बोगावत, पत्रकार कस्तुरे, बाबूराव तनपुरे, भाऊसाहेब थोरात, खताळ पाटील, आबासाहेब निंबाळकर, अण्णासाहेब शिंदे, शंकरराव कोल्हे, बाळासाहेब विखे पाटील इत्यादी नेत्यांच्या एकत्र येण्याने मुळा व कुकडी धरणाचे पाणी अतिशय संघर्षातून मिळाले.शिवाजीराव बापूंनी राजकारणामध्ये प्रवेश केला. १९५७ ते १९७२ पर्यंत वांगदरीचे सरपंचपद, सेवा सोसायटीचे १९५८ ते १९६८ पर्यंत अध्यक्षपद भूषविले. १९६२ मध्ये पंचायत समिती सदस्यपदी त्यांची निवड झाली. महाराष्टÑामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सर्व घटकांना काँग्रेसच्या  झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यावेळी बापूंनी श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सहकाºयांसमवेत डाव्या चळवळीला अखेरचा सलाम करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हे सर्व करीत असताना बापूंच्या बंधुंनी व पत्नी कौशल्यादेवी (माई) व विठ्ठलराव (आप्पा) यांनी अतिशय मोलाची साथ दिली. बापूंना दोन मुले, चार मुली, थोरले राजेंद्र (दादा) नागवडे व धाकटे चिरंजीव दीपकशेठ नागवडे. हे शिक्षण घेत असताना मुलींना, पुतण्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.गोरगरीब जनतेच्या मुलामुलींच्या शिक्षणाची काळजी बापूंना वाटू लागली. तालुक्यात रयत शिक्षण संस्थेने हायस्कूल सुरू केले. परंतु तालुक्यातील बहुतांश खेडी माध्यमिक शिक्षणापासून वंचित होती. ही बाब बापूंना शांत बसू देत नव्हती. समाजाला जर पुढे न्यायचे असेल तर तालुक्यातील खेडोपाडी शिक्षणाची सोय करण्यासाठी  १९८२ मध्ये श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून आठ माध्यमिक विद्यालये सुरू केली. श्रीगोंदा येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय स्थापन केले. तालुक्यातील मुलामुलींना इंजिनियर बनण्याची संधी निर्माण करून बेलवंडी येथे महाराष्टÑातील पहिले विना अनुदानीत तत्त्वावर पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्याकडून त्यावेळच्या शिक्षणमंत्री शरदचंद्रिका पाटील यांच्याकडून अतिशय कडवा संघर्ष करून कॉलेज मिळविले. एकाच संस्थेस माध्यमिक विद्यालये मिळवण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यांनी यामुळे १९८७ साली ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून खेडोपाडी व दुर्गम भागात १३ माध्यमिक विद्यालये व ४ कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली. श्रीगोंदा शहरामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा व सोनिया गांधी पॉलिटेक्निक, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून  सुरू केले. यामुळेच श्रीगोंदा तालुक्यामध्ये शिक्षणमहर्षी म्हणून बापूंची ओळख आहे.शासन दरबारी लोकप्रतिनिधी म्हणून बापूंना फक्त दोनदाच संधी मिळाली. १९७८ ते १९८० व १९९९ ते २००४ या कालावधीमध्ये विधानसभा सदस्य म्हणून जे काम केले ते चिरकाल जनतेच्या स्मरणात राहिल. राजकारणामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, स्व.विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले. १९७९ साली स्व.इंदिरा गांधी यांना आणीबाणीच्या काळात अटक केल्यानंतर बापूंनी हजारो कार्यकर्त्यांसह तहसील कचेरीवर विराट मोर्चा नेला. दोन हजार कार्यकर्त्यांसह त्यांना अटक  झाली. त्यामध्ये बापूंना २१ दिवस तुरुंगवास भोगावा लागला. तद्नंतर दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या श्रीगोंदा तालुका दौºयाचे यशस्वी नियोजन केले. काँग्रेस पक्षाने बापूंना ६ वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्यामध्ये त्यांना दोनदाच यश आले. ४ वेळा अपयश पदरी पडले. परंतु ते अपयशाने कधीही खचले नाहीत. बापू संयुक्त महाराष्टÑ चळवळीत  १९५६ ते १९६१ पर्यंत सक्रिय राहिले. त्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम केले.साखर धंद्याच्या अभ्यासासाठी ब्राझीलला तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत परदेश दौरे यशस्वी केले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना राज्यस्तरावर महत्त्वाच्या संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन (पुणे)े या संस्थेचे अध्यक्षपद, नॅशनल फेडरेशन आॅफ शुगर फॅक्टरीज नवी दिल्लीचे संचालक  १९९२ ते १९९६ व २०१५ ते २०१८ नॅशनल हेवी इंजिनिअयरिंगचे संचालक, २००० ते २०१८ महाराष्टÑ राज्य शेती महामंडळ संचालक. १९८० ते १९८३ अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, महाराष्टÑ राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद त्यांनी २०१५ ते २०१८ दरम्यान भूषविले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये समाजकारण व राजकारण करीत अनेक सहकाºयांना बरोबर घेतले. त्यामध्ये स्व.बाळासाहेब विखे पाटील, स्व.भाऊसाहेब थोरात, स्व.शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, बाळासाहेब  थोरात, राधाकृष्ण विखे, यशवंतराव गडाख, दादा पाटील शेळके यांचा सहभाग होता. त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास कामाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाºया १८.५ कि.मी. लांबीचा व १०० कोटी खर्चाची ऐतिहासिक भोसा खिंड योजना विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतली. ते काम यशस्वीपणे पूर्ण केले. या क्रांतिकारी योजनेमुळे ३१ गावातील ८५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. शेतकºयांना दिल्या जाणाºया कर्जावरील व्याजदर कमी करण्याकरीता शेकडो शेतकºयांसह मुंबईला रिझर्व बँकेवर मोर्चा नेला. १९८३ मध्ये दिल्ली येथे झालेल्या ‘किसान मेला’ कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो शेतकºयांसह सहभाग घेतला.महाराष्टÑातील सहकारामध्ये जी जाणती मंडळी होती, त्यामध्ये बापूंचे स्थान अग्रभागी होते. आजारी साखर कारखान्याच्या पुनर्वसनासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले जात. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराईच्या जय भवानी साखर कारखान्याचे त्यांनी दोन वर्षे मार्गदर्शक म्हणून काम केले. नगर तालुका साखर कारखाना उभारणीत मोलाचे सहकार्य केले. कुकडी धरणातील पाणी विसापूर धरणात सोडण्याकरीता १६ कि.मी. कालव्याचे काम करून घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव निलंगेकर, तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून खास मान्यता घेऊन विसापूर धरणात पाणी सोडले. या सर्व कामाची पावती म्हणून या तालुक्यातील जनतेने श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे नामकरण  सहकारमहर्षी श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना असे केले. 

लेखक : बी.के. लगड (प्राचार्य, नागवडे विद्यालय, वांगदरी)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत