पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसराला हिवताप, सर्दी, खोकला आदींसह अनेक आजारांचा विळखा पडला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या साथीच्या आजाराने गावातील खासगी दवाखाने रुग्णांनी फुल झाली आहेत.
आधीच कोरोनाच्या लाटेने त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला या साथीच्या आजारानेही हैराण केले आहे. कुटुंबागणिक एक व्यक्ती आजारी असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे परिसरात पाण्याचे डबके साचून राहत असल्याने डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सततच्या पावसामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे उद्भवही खराब झाले असून, हे पाणी सध्या पिण्यास अयोग्य ठरत आहे.
गावात गवताचे प्रमाणही खूप वाढले असून, डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत प्रशासनाने डास निर्मूलन फवारणी केली होती. मात्र, तरीही आजारग्रस्त रुग्णाची संख्या कमी होताना दिसत नाही.
गावात शासकीय प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या आरोग्य उपकेंद्राला उशिरा का होईना जाग आली असून, गत दोन दिवसांपासून उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यात जंतनाशक गोळ्यांचेही वाटप आहे. आशासेविका वगळता अन्य कर्मचारी लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी असतात.
आशासेविकांमार्फत कंटेनर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. पाण्यात औषधे टाकून घरगुती पाण्याच्या टाक्या साफ केल्या जात आहेत. १ ते १९ वयापर्यंतच्या मुलांना जंतनाशक गोळ्यांचेही वाटप सुरू आहे.
-संदीप भालेराव,
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य उपकेंद्र, पाचेगाव
..................
आरोग्य उपकेंद्र व्हेंटिलेटरवर
पाचेगावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र एका कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि एका शासकीय आरोग्यसेविकेच्या भरवशावर आहे. त्यात कोरोना प्रतिबंधकसह वेगवेगळ्या प्रकारच्या लसीकरण मोहिमा सुरू असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य उपकेंद्रातील मानसन्मानावरून वेळोवेळी या कर्मचाऱ्यांत खटके उडतात. एकंदरच आरोग्य उपकेंद्रच सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.
250921\1536-img-20210925-wa0030.jpg~250921\img-20210925-wa0029.jpg~250921\img-20210925-wa0027.jpg
पाचेगावात कंटेनर सर्व्हे सुरू करण्यात आला असून औषध टाकून टाक्या साफ केल्या जात आहरे.~पाचेगावात कंटेनर सर्व्हे सुरू करण्यात आला असून औषध टाकून टाक्या साफ केल्या जात आहे.~पाचेगावात कंटेनर सर्व्हे सुरू करण्यात आला असून औषध टाकून टाक्या साफ केल्या जात आहे.