अहमदनगर : सीना नदीची साफसफाई मोहीम सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी सीना पात्रातील गाळपेराच्या अतिक्रमणांची पाहणी केली. गाळपेरावरील पीक दोन दिवसात काढून घ्या, अन्यथा महापालिकेकडून पिके काढण्यात येतील, असे जिल्हाधिका-यांनी शेतक-यांना बजावले. बुधवारी सातशे ते आठशे ब्रास माती नदीपात्रातून काढून नेप्ती बाजार समिती परिसरात टाकण्यात आली आहे.शहरातील सीना नदीपात्राची सलग तिस-या दिवशीही साफसफाई मोहीम सुरूच होती. तिसºया दिवशी पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मातीचे भराव हटविण्याचे काम वेगात सुरू होते. टिळक रोड परिसरातील नदीपात्रातील माती काढण्यात आली. दोन शेतकºयांनी २० ते २५ डंपर माती घेतली आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नदीकाठच्या गाळपेरीच्या शेतीत जाऊन पिकांची पाहणी केली. तेथील शेतकºयांशी चर्चा केली. त्यांना पिके काढून घेण्याबाबत बजावले. यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, अभियंता परिमल निकम, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे, शहर अभियंता विलास सोनटक्के आदींची उपस्थिती होती. भर उन्हात सीना नदीच्या पात्राची पाहणी केल्याने कर्मचा-यांचीही तारांबळ उडाली.पात्रातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवातसीना नदी पात्रात वीटभट्टी, पक्की बांधकामे, पत्र्यांची शेड आणि गाळपेर आदी प्रकारची अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांना अद्याप हात लावलेला नाही. सीना पात्र साफ करण्यास पहिले प्राधान्य दिले असले तरी अतिक्रमणधारकांना सार्वजनिक नोटीस पूर्वीच देण्यात आलेली आहे. बुधवारी एका हॉटेलची पक्की इमारत जमिनदोस्त करण्यात आली. तसेच पात्रातील शेडही स्वत:हून काढून घेण्यात आले. अतिक्रमणे न काढल्यास त्यांच्यावरही एक-दोन दिवसात हातोडा टाकण्यात येणार आहे.
सीना नदीच्या गाळपेरावरील पिके काढण्याचा जिल्हाधिका-यांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:52 AM