संगमनेर : राज्याला पुढील मंत्री या तरुण आमदारांमधूनच मिळेल, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा मेधा महोत्सव राज्यात नावाजलेला महोत्सव आहे. भविष्यात राज्याचे नेतृत्व करणारे नेते समोर आहेत. विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या तरुण व उच्च शिक्षित आमदारांमध्ये राज्याचे व देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
पुढील काळात मंत्री, मुख्यमंत्री तरुण आमदारांमधून मिळेल-बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:35 PM