अहमदनगर : पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून थापलिंग खंडोबा मंदिर राळेगण म्हसोबा (ता. नगर) येथील मंदिराच्या पेव्हिंग ब्लॉक कामाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर, संतोष हराळ, गणेश भापकर, विलास साळवे, विक्रम भापकर, मयूर पिंपळे, शिवाजी पिंपळे, सुभाष डावखरे, कैलास भापकर, आप्पा कुलांगे, उमेश रासकर, संतोष हजारे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब जगदाळे, माणिक पिंपळे, सोपान कुलांगे, मोहन पिपंळे, अर्जुन खराडे उपस्थित होते.
हराळ म्हणाले, भापकर यांनी उपसभापतीपदाचा पदभार घेतल्यानंतर कोरोनाने डोकेवर काढली. बाहेर पडणेही अवघड झाले होते. तरीही नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ त्यांनी मिळवून दिला.
---
१८ राळेगण