सुपा : जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत व वाडेगव्हाण (ता. पारनेर) ग्रामपंचायत यांच्या १५ व्या वित्त आयोगातून मंजूर विविध विकासकामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या हस्ते पार पडला.
वाडेगव्हाण येथील जवळपास १३ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा प्रारंभ या निमित्ताने झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या दिवशीच आयोजित कार्यक्रमात सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी स्वागत केले. यावेळी उपसरपंच रवींद्र शेळके, ग्रामसेवक जी. एस. धावडे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश खंदारे, योगेश रासकर, किशोर यादव, डॉ. नरवडे, अमोल यादव, माजी सरपंच भानुदास घनवट, सचिन रासकर, उदय शेळके, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस कैलास सोनवणे, तुषार बोरगे, अशोक शेळके, तात्यासाहेब शिंदे, लवअंकुश शेळके, प्रकाश गाडेकर, कमलाकर रासकर, संतोष शेळके, विजय शेळके, विजय खंदारे, फिरोज हवालदार, टिपू सुलतान युवा मंचचे अध्यक्ष इसाक शेख, आदी उपस्थित होते.
---
१० वाडेगव्हाण
वाडेगव्हाण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना जि. प. सदस्य राणी लंके, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच रवींद्र शेळके व इतर.