शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

वाळूच्या डंपर चालकाविरूद्ध शेवगावात गुन्हा दाखल : युवकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 7:05 PM

शरद एकनाथ सोनवणे (वय २२, रा. आखतवाडे) या युवकाचा वाळूच्या डंपरचालकाने रविवारी रात्री बळी घेतल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास तब्बल २४ तास लागले.

शेवगाव : शरद एकनाथ सोनवणे (वय २२, रा. आखतवाडे) या युवकाचा वाळूच्या डंपरचालकाने रविवारी रात्री बळी घेतल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास तब्बल २४ तास लागले. सोमवारी रात्री याबाबत डंपरचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.शेवगावहून नगरकडे निघालेल्या वाळूने भरलेल्या डंपरने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरून शेवगावकडे येणारा शरद सोनवणे हा रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जागीच ठार झाला. मयताचे वडील एकनाथ मच्छिंद्र सोनवणे यांनी पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी डंपर (क्रमांक एम. एच. १६, ए. वाय. ५४५) चालक किरण राजेंद्र काटे (रा.मुंगी, ता.शेवगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. अपघातानंतर पोलिसांनी डंपर पोलीस ठाण्यात आणून लावला आहे. युवकाच्या मृत्यूबाबत पोलिसांनी सुरूवातीस अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर माळवे अधिक तपास करीत आहेत.शेवगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद असल्याचा दावा महसूल व पोलीस प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. पण तालुक्यात राजरोसपणे रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या जनतेतून तक्रारी असून गोदावरी नदीच्या पात्रातील मुंगी व तालुक्यातील विविध नदी पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर