अहमदनगर : कोरोना महामारीच्या संकट काळात माथाडी कामगार जीव धोक्यात घालून काम करीत असून, ठेकेदार प्रशासनाकडून दिशाभूल करीत आहेत. कामगार विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी माथाडी कामगारांचे मुकादम विलास उबाळे यांनी केली आहे.
यावेळी रेल्वे मालधक्का माथाडी कामगार मुकादम पोपट लोंढे, गणेश कंदूर, सुरेश निरभवणे, गणेश जाधव, भगवान शेंडे, विलास गुंड, रोहिदास भालेराव, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय अनवणे, मधुकर पाटोळे, शरद वाघचौरे, वसंत पेटारे, बळिराम शेंडे, दीपक रोकडे, सागर पोळ, संभाजी कोतकर, पंडित झेंडे, संजय पाडळे, संजय शिरोळे यांच्यासह माथाडी कामगार उपस्थित होते. यासंदर्भात माहिती देताना उबाळे यांनी सांगितले, की सिमेंट गोण्या वाहण्याचे काम अत्यावश्यक सेवेत मोडत नाही. मात्र, हुंडेकरी यांच्या आग्रहाखातर त्यांचे काम करीत आहोत. कामगार लोकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे कामकाज ठप्प होत असल्याचा आरोप हुंडेकरी विनाकारण हेतूपुरस्सर करीत आहेत. माथाडी कामगारांना विमा संरक्षण आहे. परंतु, चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. ठेकेदाराचे सर्व आरोप निराधार असून, सहायक कामगार आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
...
सूचना : फोटो आहे.