दुचाकी वाहनांच्या अपघातात नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर) येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा गुडघ्याला मोठी दुखापत झाली होती. या रुग्णाला उपचारासाठी कुटे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. रुग्णाची डॉ. पगडाल यांनी तपासणी करत एमआरआय व काही चाचण्या करण्यास सांगितले. त्यात गुडघ्यातील अस्थिबंध फाटले असल्याचे निदान झाले. अस्थिबंधावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. अशा प्रकारची व्याधी फारच दुर्मीळ आहे. डॉ. पगडाल यांनी फाटलेल्या अस्थिबंधावर दुर्बीणीद्वारे अत्यंत गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया यशस्वी केली. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. सोनाली कुटे तसेच या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचे संचालक डॉ. कुटे यांचे मार्गदर्शन लाभले. अस्थिबंधावरील शस्त्रक्रिया या बड्या शहरांमध्येच होतात. डॉ. पगडाल हे आर्थोस्कोपी सर्जरीत (दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया) प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आहेत. बड्या शहरांमध्ये होत असलेल्या कमी अथवा बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया कुटे हॉस्पिटलमध्ये नेेहमीच होतात, असेही संचालक डॉ. कुटे यांनी सांगितले.
(वा.प्र.)