पारनेर : शहरातून आलेला ओला व सुका कचरा वेगवेगळा करून त्याचे कंपोस्ट खत निर्मिती करण्याचा प्रकल्प नगरपंचायतीने उभारला आहे. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट होऊन खताच्या माध्यमातून उत्पन्नही मिळणार आहे.
पारनेर शहरात मोठ्या प्रमाणावर दररोजचा कचरा पूर्वी रस्त्यावर पडत होता. त्यातून आरोग्यालाही हानी पोहोचत होती. नगरपंचायत निर्मिती झाल्यानंतर कचरा जमा करण्यात येत होता. मात्र कचरा वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात येऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत होता. नगरपंचायतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा डेपो पारनेर-जामगाव रस्त्यावर तराळवाडी येथे उभारला. तेथे कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प तयार केला, असे मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी सांगितले.
--
पारनेर नगरपंचायतीने उभारलेल्या कंपोस्ट खत निर्मितीमुळे शेतकऱ्यांनाही कंपोस्ट खत मिळून त्याचा फायदा होणार आहे. कंपोस्ट खतामधून नगरपंचायतीला उत्पन्न सुरू होईल.
-सुधाकर भोसले,
प्रशासक, नगरपंचायत, पारनेर
--
पारनेर शहरातून कचरा वाहनातून जमा करण्यात येतो. त्यातून ओला व सुका कचरा वेगळा करून त्यातून आठ ठिकाणी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प तयार केला आहे. यामुळे कचऱ्याचा निचरा होऊन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
-डॉ. सुनीता कुमावत,
मुख्याधिकारी, नगरपंचायत, पारनेर
--
२७ पारनेर
पारनेर नगरपंचायतीने उभारलेल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केंद्रास प्रांताधिकारी सुधाकर भोसले, मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी भेट देऊन पाहणी केली.