शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, ईव्हीएम मशीन हटवा, देश वाचवा, अशा घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणला. आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती क्रांती सेनेचे बाळासाहेब मिसाळ, बहुजन क्रांती मोर्चाचे राजेंद्र करंदीकर व राष्ट्रीय किसान मोर्चाचे बाळासाहेब पातारे यांनी केले. आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष शिवाजी भोसले, जालिंदर चोभे, ह. भ. प. भगवान महाराज शास्त्री, डॉ. भास्कर रणनवरे, विद्यार्थी मोर्चाचे मनोहर वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे अविनाश देशमुख, हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, राजू मदान, गणपतराव मोरे, डॉ. रमेश गायकवाड, गणेश चव्हाण, अय्युब शेख, भीमराव बडदे, सागर निंभोरे, सौरव बोरुडे, भाऊसाहेब फुलमाळी, नवनाथ शिंदे, सुरेश रोकडे, राजू उघडे, हिरामण सोनवणे, शामराव काते, कुमार बोरुडे, राजू साळुंखे, आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या प्रमुख वक्त्यांनी केंद्र सरकारविरोधात टीका करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
फोटो १७ आंदोलन
ओळी- नव्याने पारित करण्यात आलेले कृषी कायदे कायमचे रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची सांगता तीव्र निदर्शनाने झाली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी व कार्यकर्ते.