याकडे संबंधित ठेकेदारासह कोपरगाव नगर परिषदेचे दुर्लकक्षच झाले असल्याची ‘लोकमत’ने बुधवारच्या (दि. २०) अंकात बातमी प्रकाशित केली होती. या बातमीनंतर ठेकेदार व नगर परिषद प्रशासन खडबडून जागे होत बुधवारी सकाळपासून या मैदानाच्या काँक्रिटीकरणास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली होती.
कोपरगाव शहाराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारील डॉ. आंबेडकर मैदान येथे प्रशस्त जागा आहे. या मैदानावर शहरासह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे या मैदानाचे मोठे महत्त्व आहे. त्यासाठी नगर परिषदेने शुशोभीकरण करण्यासाठी १८ लाख खर्चाचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. त्याचे उद्घाटन झाले होते; परंतु तीन आठवडे उलटूनही काम सुरू करण्यात आले नव्हते. मात्र, ‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून हा प्रकार समोर आणताच हे काम सुरू करण्यात आले आहे. काम सुरू झाल्याने रस्त्यावर असलेले खडी, वाळू हे साहित्य कामात वापरले जाऊन रहदारीचा रस्ता मोकळा होणार असल्याने नागिरकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
...................
फोटो२०- कोपरगाव काँक्रीट
200121\img_20210120_155455.jpg
कोपरगाव शहरातील आंबेडकर मैदानाचे काँक्रिटीकरणाचे काम बुधवारी सूर करण्यात आले. ( छायाचित्र - रोहित टेके)