"राष्ट्रविरोधी ताकदीशी हात मिळवण्यास काँग्रेस मागे पुढे पाहत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:23 PM2022-09-30T12:23:52+5:302022-09-30T12:24:58+5:30

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांची टीका

"Congress does not hesitate to join hands with anti-national forces", Says pralhad patel | "राष्ट्रविरोधी ताकदीशी हात मिळवण्यास काँग्रेस मागे पुढे पाहत नाही"

"राष्ट्रविरोधी ताकदीशी हात मिळवण्यास काँग्रेस मागे पुढे पाहत नाही"

संगमनेर : काँग्रेस जेव्हा सत्तेपासून दूर असते तेव्हा काँग्रेस बेचैन असते. दुर्भाग्यपूर्ण ८० चे दशक पहा अथवा वर्तमान स्थिती पहा. राष्ट्रविरोधी ताकदीशी हात मिळवण्यास काँग्रेस मागे पुढे पाहत नाही. पीएफआयवर बंदीवरून काँग्रेस नेत्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केली. 
  
केंद्रीय राज्यमंत्री पटेल हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर असून शुक्रवारी ( दि.२९) ते संगमनेरात आले होते. त्यांच्यासमवेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पक्षाला जोडता येत नाही आणि राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत. उद्देश चांगला नसेल तर त्याचे परिणाम देखील चांगले निघत नाहीत. असेही पटेल म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: "Congress does not hesitate to join hands with anti-national forces", Says pralhad patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.