पुढील आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांचा शहरात दौरा होत आहे. त्याच्या तयारीसाठी यशोधन कार्यालयात आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार कानडे बोलत होते. या वेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, मुन्ना पठाण, रमजान शाह, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, ॲड. समीन बागवान उपस्थित होते.
कानडे म्हणाले, आगामी पालिका निवडणुकीला काँग्रेस पक्ष संघटितरीत्या सामोरा जाणार आहे. पक्षाच्या माध्यमातून त्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणूक लढावयाची आहे. श्रीरामपूर शहर ही माझी प्रतिष्ठा असून, शहरावर नितांत प्रेम आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी युती अथवा आघाडीचा कोणताही विचार न करता केवळ काँग्रेसचा विचार करावा. उपनगराध्यक्ष ससाणे यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला मंत्री थोरात व प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा दौरा ही मोठी संधी आहे. यानिमित्त संपूर्ण शहर काँग्रेसमय होणार असल्याचे सांगितले.
सचिन गुजर म्हणाले, दिवंगत जयंत ससाणे यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात संपूर्ण शहर काँग्रेसमय केले. त्याच पद्धतीने भविष्यकाळात काँग्रेसचा प्रभाव निर्माण करावयाचा आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले व मंत्री थोरात यांचा दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी शहर काँग्रेसची राहील, अशी ग्वाही या वेळी संजय छल्लारे यांनी दिली. मुजफ्फर शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यास सरवरअली सय्यद, राजेंद्र पाऊलबुद्धे, बाबासाहेब कोळसे, भारत भवार, महंता यादव, रितेश रोटे, कार्लस साठे, फयाज कुरेशी, असीफ दारूवाला, जफर शाह, प्रताप देवरे, दीपक कदम आदी उपस्थित होते.
----------
फोटो ओळी : कानडे
यशोधन कार्यालयात आयोजित काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आमदार लहू कानडे.
--------