अहमदनगर : जिल्ह्यात रोज तीन हजारजणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो. मात्र, पहिल्यांदाच ही संख्या तीन हजारांच्या खाली आली आहे. सोमवारी २८६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ३१९५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली असून ती आता २२ हजार ८४० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १६०८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६४२ आणि अँटिजेन चाचणीत ६१६ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १८८, अकोले २४१, जामखेड ९१, कर्जत १०५, कोपरगाव ३०, नगर ग्रामीण ७३, नेवासा ४०, पारनेर ९२, पाथर्डी ९७, राहता ३८, राहुरी २८, संगमनेर २२४, शेवगाव २१८, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ५१, कॅंटोन्मेंट बोर्ड ४९, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २३२, अकोले २२, कर्जत ६, कोपरगाव ८, नगर ग्रामीण ३३, नेवासा १०, पारनेर ५, पाथर्डी ३, राहाता ८१, राहुरी ८, संगमनेर १६२, श्रीगोंदा ८, श्रीरामपूर २५, कँटोन्मेंट बोर्ड २३ आणि इतर जिल्हा १५ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज ६१६ जण बाधित आढळून आले. नगर शहर ४९, अकोले १४, जामखेड ९, कर्जत ७२, कोपरगाव ३४, नगर ग्रामीण ५१, नेवासा ७४, पारनेर २९, पाथर्डी २६, राहाता ४०, राहुरी ८४, संगमनेर ६, शेवगाव १६ श्रीगोंदा ८१, श्रीरामपूर २५ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत ३४ जणांचा मृत्यू झाल्याची पोर्टलवर नोंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
------------
बरे झालेली रुग्ण संख्या : १,३७,६८६
उपचार सुरू असलेले रूग्ण : २२,८४०
मृत्यू : १८४९
एकूण रुग्ण संख्या : १,६२,३७५