अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत ३५०० नागरिकांची ट्रेसिंग करण्यात आली आहे.
शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारी ३८२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागिरकांची तपासणी करण्यासाठी ७२ वसुली कर्मचाऱ्यांचे ७ पथके स्थापन केली आहे. या पथकाने मागील आठवडाभरात ५०० कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील ३ हजार ५०० नागरिकांचा शोध घेऊन त्यांना तपासणीसाठी पाठविले. नव्याने आढळलेल्या रुग्णांची यादी तयार करून बाधित रुग्णांच्या कुटुंबातील व इतरांचा शोध घेण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मनपाने कठोर पावले उचलली आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने शहरात कंटेन्मेंट झोन केलेले आहेत. या भागातील नागरिकांना सशुल्क दूध, भाजीपाला, औषधे आदी अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहेत. त्यासाठी ३२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
....
मनपाचे मिशन ब्रेक द चेन
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेनेही बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम उघडली आहे. दिवसभरात किती ट्रेसिंग झाले, याची आढावा नियमित घेतला जात आहे. तसा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येत असून, साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
....