अहमदनगर : रेल्वे स्टेशन प्रभाग क्रमांक १५मधील बोहरी चाळ, संभाजी वसाहत परिसरात नळाला मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असून, या भागातील पाणीपुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यासह नागरिकांनी दिला.
रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांसह माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संभाजी पवार, महेश सुपेकर, विजय गायकवाड, पप्पू शेख, महेश अल्हाट, निखिल गायकवाड, गणपत वाघमारे, सचिन वाघमारे, भाऊ चौधरी, महालू शिपणकर, समीर शेख, संजू जरबडी, प्रवीण औटी, बाळू ठाणगे, हिरा पाडळे, भारत कदम आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी निवेदनात म्हंटले आहे, की रेल्वे स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या निकामी झाल्या आहेत. त्या पूर्णपणे सडल्या असून, त्याद्वारे ड्रेनेज लाइनचे पाणी जाते. मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली. परंतु, कार्यवाही झाली नाही. या भागात शुद्ध व उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गव्हाळे यांनी दिला आहे.
....
सूचना फोटो:०९ एनसीपी नावाने आहे.