कोपरगाव : मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी,कष्टकरी, व्यापारी व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. मतदार संघातीलजनतेवर अन्याय झाला त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. सर्व सामान्यांसाठी लढल्याने मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी उभी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले. तालुक्यातील कान्हेगाव, कोकमठाण येथे काळे यांनी रविवारी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, संचालक सुदाम लोंढे, प्रसाद साबळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, लक्ष्मण चौधरी, देवचंद कडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये कोकमठाण येथील साहेबराव रक्ताटे, राजेंद्र रक्ताटे, राजेंद्र वाघ, भाऊसाहेब रक्ताटे, रघुनाथ रक्ताटे, गणेश रक्ताटे, आबा रक्ताटे, सुनील रक्ताटे, परसराम रक्ताटे, दीपक रक्ताटे, भाऊसाहेब रक्ताटे, गणेश वाघ, अमोल रक्ताटे, विशाल शितोळे, महेश रक्ताटे, आसाराम रक्ताटे, महेश रक्ताटे, प्रशांत महाजन, अरुण पाडेकर, गणेश रक्ताटे, कांतिलाल रक्ताटे, एकनाथ दराडे, विष्णू कांबळे, कपिल महाजन, ऋषिकेश महाजन, निलेश महाजन, सोमनाथ महाजन, प्रदीप रवंदकर, विनायक सोनवणे, परसराम आव्हाड, अजित रक्ताटे, माणिक आव्हाड, संभाजी देशमुख, यावेळी कान्हेगाव येथील सरदार शेख, बापू घोडे, बबन आल्हाट, शांताराम भारसाकळ, राजेंद्र सौदागर, राधाकृष्ण सोळसे, नाना सोळसे, गणेश सोळसे, शिवाजी सोळसे, सीताराम सोळसे, बन्सी सौदागर, सुकदेव सोळसे, मच्छिंद सोळसे, बाळू सोळसे, चांगदेव सोळसे, भीमराव सोळसे, गोरख सोळसे, अमोल मोरे, श्रावण सोनवणे, सुकदेव सोनवणे, दीपक भोकरे, संपत मांदळे, परसराम शिराळे, लीलाबाई लोहोकरे, दत्तु मगर, गौतम मगर, भास्कर तायडे, अनिल तायडे, मधुकर तिवारी,बाबूराव हिवराळे, प्रकाश हिवराळे, शांताराम हिवराळे, रघुनाथ सानप, बाळासाहेब नेवगे, बाळासाहेब जाधव, मारुती आहेर, मधुकर जाधव, रंगनाथ गवारे, अंजना जाधव, अशोक पवार, बबन कराळे, अशोक कराळे, कमल गुंजाळ, भाऊराव मायदंळे, नारायण विंचू, पांडुरंग तळेकर, शोभा जाधव, मुकुंद पांडव, हौशाबाई सुराळकर, एकनाथ ढमाले, अमोल सोळसे, सचिन सोळसे, राऊसाहेब हिवराळे, परसराम गिरी, संजय चव्हाण, दत्तात्रय काजळे, किशोर तायडे, गणेश गोसावी, सुनील गिरी, ज्ञानेश्वर गिरी, बाबासाहेब दाणे, कचरू गोर्डे, अक्षय काजळे यांचा समावेश आहे.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष-आशुतोष काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 2:01 PM