अहमदनगर: शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामावर नाराजी व्यक्त करत जून अखेर काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना महापौर संग्राम जगताप यांनी सोमवारी संबंधित ठेकेदारास दिल्या़तसेच जलकुंभाची चाचणी घेण्याचे यावेळी ठरले़ महापौर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक घेण्यात आली.उपमहापौर सुवर्णा कोतकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त भालचंद्र बेहरे, पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम,उपअभियंता ए़ बी़ चौगुले यावेळी उपस्थित होते़ शहर सुधारित पाणीपुरवठा योजना रखडली आहे़ठेकेदार संस्थेला दिलेली मुदत संपुष्टात आली आहे़ दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़याविषयी प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेण्याचे ठरले आहे़ त्यानुसार ही बैठक घेण्यात आली़ पाणी योजनेचे कामाबाबत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली़योजनेच्या कामास गती मिळावी,यासाठी योजनेच्या कामाचे चार विभाग करावे,अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या़ ठेकेदार संस्थेकडे कामगार कमी असल्याचे यावेळी अधिकार्यांनी जगताप यांच्या निदर्शनास आणून दिले़ त्यामुळे ठेकेदाराने कामगार वाढवावेत़ निर्मलनगर येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे़ या जलकुंभाचे येत्या ३० मे पर्यंत जलकुंभाची चाचणी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या़ (प्रतिनिधी) एमजीपीच्या अधिकार्यांना खडसावले पाणी योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती करण्यात आली आहे़मात्र हे अधिकारी आढावा बैठकीस उपस्थित राहत नाहीत़ त्यामुळे विद्युत मोटारींचे काम रखडल्याचे यावेळी निदर्शनास आले़या अभियंत्यांची संख्या वाढवून कामावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी संबंधित अधिकार्यांना दिल्या़
ठेकेदाराला जून अखेरची डेडलाईन
By admin | Published: May 19, 2014 11:25 PM