श्रीगोंदा : धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा नसताना घोडचे आवर्तन सोडण्यास भाग पाडण्यात आले. येत्या १५ जूननंतर कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलतान्ाां दिली. ते म्हणाले, कुकडी प्रकल्प आठमाही आहे. यातून तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तीन आवर्तने सोडली. सध्या कुकडी प्रकल्पात २.७ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रकल्पातील साडेपाच टीएमसीचे बाष्पीभवन झाले तर सव्वाचार टीएमसी पाणी वाया गेले आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्यात येऊन फळबागा जगविल्या. कुकडीचे पाणी जिल्हाधिकार्यांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या अहवालानुसार १५ जूननंतर कुकडीचे आवर्तन सुटू शकते. श्रीगोंदा नगरपालिका व काष्टी ग्रामपंचायतीने यापुढे ५० दिवस पाणी लागणार नाही असे लेखी दिल्याने घोडचे आवर्तन सोडण्यात आले. बंधार्यातील पाणी मिळाले तर घोडचे आवर्तन पूर्ण क्षमतेने होऊ शकते, असे पाचपुते म्हणाले. एक जूननंतर श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव, लिंपणगाव वीज उपकेंद्राचे काम सुरु होणार आहे. जून महिन्यात उर्वरित पाच उपकेंद्रांची कामे सुरु होणार आहेत. हिंगणी, मढवडगाव, मांडवगण उपकेंद्राची क्षमता दुप्पट करण्यात येणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) विरोधकांना टोला ‘घोड‘, ‘कुकडी’ च्या आवर्तनासाठी मुंबईत तीन दिवस तळ ठोकला. अधिकार्यांना बैठकीत तासभर उभे केले. त्यामुळे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. रस्त्यावर बसून अगर आंदोलन करुन पाणी सुटत नाही, असा टोला बबनराव पाचपुते यांनी विरोधकांना मारला.
१५ जूननंतर कुकडीचा निर्णय
By admin | Published: May 30, 2014 11:26 PM