शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सहकाराचा स्वाहाकार : कर्जबुडव्यांमुळे एनपीए वाढला

By मिलिंदकुमार साळवे | Published: January 03, 2019 11:03 AM

वैद्यक व्यावसायिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या कर्ज प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संशयित बुडित कर्जाच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : वैद्यक व्यावसायिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या कर्ज प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संशयित बुडित कर्जाच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.बँकेच्या सन २०१७-१८ च्या ४७ व्या वार्षिक अहवालातून ही बाब समोर आली आहे. कर्ज बुडवेगिरी करणाऱ्या थकबाकीदारांचे प्रमाण वाढल्यामुळे बँकेला अनुत्पादक कर्जासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रूपयांची तरतूद (एन. पी. ए.) करावी लागत आहे. बँकेला ३१ मार्च २०१८ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ५ कोटी ५२ लाख ४९ हजार रूपयांचा नफा झाल्याचे ताळेबंदात दाखविण्यात आले आहे. सन २०१६-१७ मध्ये ५ कोटी ४६ लाख २५ हजार रूपयांचा नफा झाला होता. त्या तुलनेत नफा ६ लाखांनी वाढल्याचे दिसते.मात्र, सन २०१५-१६ मध्ये ६ कोटी ५५लाख ९५ हजार रूपये सर्वाधिक नफा झाला होता. या नफ्याच्या तुलनेत दोन वर्षातच १ कोटी ३ लाख रूपयांची घसरण झाली आहे. यामागेही गेल्या दोन वर्षात कर्ज थकबाकीचे प्रमाण वाढले, हे एक महत्त्वाचे कारण दिसते.बँकेचा आर्थिक ताळेबंद सावरण्यासाठी अनुत्पादक कर्जापोटी कराव्या लागणाºया एन. पी. ए. तरतुदीमध्येही वाढ करावी लागत आहे. सन १५-१६ मध्ये ९ कोटी १२ लाख रूपयांची एन. पी. ए. तरतूद करावी लागली होती. १६-१७ मध्ये या तरतुदीत दुपटीने वाढ होऊन ती १५ कोटी ५२ लाख करावी लागली. सन २०१७-१८ मध्ये ती ३० कोटी ८९ लाख रूपये करावी लागली. ही तरतूद अनुत्पादक कर्जांसाठी करावी लागते. एनपीए वाढणे हे आर्थिक गैरशिस्तीचे लक्षण मानले जाते.काही वैद्यक व्यावसायिकांना दिलेल्या संशयास्पद कर्जांमुळे निवडक पाच ते सहा प्रकरणांमध्येच बँकेचे मोठे कर्ज अडकून पडले. त्यामुळे बँकेच्या कर्ज थकबाकीत प्रचंड वाढ झाली. बँकेने कर्ज वसुलीसाठी महाराष्टÑ राज्य सहकार कायदा १९६० चे कलम ९१, सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कर्जदार व जामीनदार यांच्याविरूद्ध कारवाई सुरु केलेली आहे.बँकेने कर्ज वसुलीसाठी थकीत कर्जदार व त्यांचे जामीनदार यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यामुळे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात वसुलीत वाढ होऊन थकीत कर्जाचे प्रमाण कमी होईल, अशी संचालक मंडळास खात्री आहे.बँकेची स्थिती मजबूतवैद्यकीय व्यावसायिकांच्या थकबाकीमुळे शहर बँकेच्या एनपीएचे प्रमाण वाढले असले तरी बँकेच्या आर्थिक स्थितीला त्यामुळे काही धक्का पोहचणार नाही. बँकेच्या ठेवी सुरक्षित असून बँकही नफ्यात आहे. थकीत कर्जांपोटी बँकेकडे मालमत्ताही तारण आहेत. निलेश शेळके व इतर प्रकरणात तारण मालमत्तांमधून कर्जाची वसुली होणार आहे. ठेवीदारांचे यात काहीही नुकसान होणार नाही. वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. - संतोष अनासपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, शहर सहकारी बँ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर