राजूर ग्रामपंचायत, डांग गोसेवा मंडळ, अकोले येथील अमृत सागर दूध संघ, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभाग यांच्या आर्थिक सहकार्यातून राजूर येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन भरविले जाते. यातच अकोले तालुका कृषी विभाग शेतमालाचे प्रदर्शनही भरवत असतो. नगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांतून शेतकरी आपली जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणत असतात. अनेक हौशी शेतकरी आपले वळू येथे प्रदर्शनासाठी आणत असतात. पशू वैद्यकीय विभाग डांग जातीच्या आदत, चार दाती, आठ दाती व गाभण गाय, कालवड यांचे परीक्षण करतात आणि निवड झालेल्या प्रदर्शनीय जनावरांच्या मालकांचा येथील ग्रामपंचायततर्फे सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येत असतो. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात इतर छोटे-मोठे व्यावसायिक आपली दुकाने थाटतात.
कोरोनामुळे प्रदर्शन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:53 AM