अहमदनगर : जिल्ह्याची कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ६५ हजारांच्यावर गेली आहे. सोमवारी नव्या १७८ जणांची भर पडली, तर १७४ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५०९ एवढी झाली आहे. तसेच सोमवारी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटीजेन चाचणीत ७४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (३८), कर्जत (७), कोपरगाव (२), नगर ग्रामीण (३), नेवासा (११), पारनेर (१४),पाथर्डी (३), राहाता (२५), राहुरी (९), संगमनेर (३७), शेवगाव (७), श्रीगोंदा (३), श्रीरामपूर (७), मिलिटरी हॉस्पिटल (२), अकोले (६), जामखेड (२) येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ४१ इतकी झाली तर मृत्यू झालेल्यांची संख्या ९६७ एवढी झाली आहे.