पारनेर : तालुक्यातील म्हसणे येथील एक जण कोरोनाबाधित झाला आहे. ३२ वर्षीय युवक हा गावचा जावई असून १८ मे रोजी पत्नी व मुलांसह ते म्हसणे येथे आले होते. म्हसणे येथील शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तीन दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला म्हणून स्त्राव तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले होते. सोमवारी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. नगर-पुणे महामार्गाजवळ असणाºया टोल नाक्यापासून काही अंतरावर म्हसणे गाव आहे. मराठी शाळेत पुण्यातील वाघोली व पुणे परिसरातून अनेक कुटुंब गावात आले होते. त्यांच्या गर्दीला रोखण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.म्हसणे गावामध्ये एक कुटुंब १८ मे रोजी आले होते. त्यातील ३२ वर्षीय तरुणास त्रास जाणवू लागला. यामुळे त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेऊन पाठविण्यात येणार असल्याचे पारनेरचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लोळगे यांनी सांगितले.
जावयामुळे पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; म्हसणे येथील एक जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 2:04 PM