रुईछत्तीसी (ता. नगर) येथे जगन्नाथ बाबा साहाय्यता संघ व कोरोना ग्राम सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग’ या उपक्रमांतर्गत पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी गावात कोरोनाच्या काळात कार्य केलेल्या अनेकांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, ॲम्बुलन्स चालक यांना कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आला. गावात कोरोनामुक्तीसाठी प्रभागनिहाय बक्षीस ठेवण्यात आले होते. प्रथम क्रमांक वार्ड क्र-४, द्वितीय क्रमांक वार्ड-२, तृतीय क्रमांक-वार्ड क्र-१ तर उत्तेजनार्थ बक्षीस वार्ड क्र-३ ला देण्यात आले. यानिमित्ताने पीएच.डी साठी पात्र झालेल्या संतोष भांबरे व नितीन गोरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, गटविकास अधिकारी संजय केदारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, सभापती संदीप गुंड, उपसभापती दिलीप पवार, पंचायत समिती सदस्य रवींद्र भापकर, मार्केट कमिटी सभापती अभिलाष घिगे, मार्केट कमिटी उपसभापती संतोष म्हस्के, दादासाहेब दरेकर, दीपक ठाणगे उपस्थित होते. जालिंदर खाकाळ यांनी आभार मानले. गावात प्रभागनिहाय मिळालेली सर्व बक्षिसे गावातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर कळस कामासाठी देण्यात आले.
रुईछत्तीसीचा कोरोना मुक्ती पॅटर्न अनुकरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:25 AM