जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या भरोसा सेलकडे कोरोनाकाळात दाखल झालेल्या बहुतांशी तक्रारी या कौटुंबिक हिंसाचाराच्याच आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांशी काळ लॉकडाऊन होते. यातून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले त्यामुळे घरात येणारी आर्थिक कमाई बंद झाली. अनेकांना पैशांची गरज भासू लागली. अशावेळी माहेरून पैसे आणावेत असा पतीचा पत्नीकडे आग्रह सुरू झाला. यातून बहुतांशी कुटुंबात वाद, पत्नीला मारहाण अशा घटना समोर आल्या आहेत. तसेच पतीची व्यसनधीनता, पती घरात वेळ देत नाही, कुटुंबापासून वेगळे राहणे, एकमेकांच्या अडचणी समजावून न घेणे या कारणातूनही महिलांबाबत कुटुंबात हिंसाचाराच्या घटना घडल्याची नोंद आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रार करणाऱ्या पीडित महिलांना संरक्षण अधिकाऱ्यामार्फत वैद्यकीय, कायदेशीर तसेच गरजेप्रमाणे निवासाचीही व्यवस्था करून त्यांना आधार देण्यात आला आहे.
----------------------------------
काय सांगते आकडेवारी
जिल्हा महिला व बालकल्याण विभाग - एप्रिल २०१९ ते मार्च २०२०- २१६ तक्रारी दाखल
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ ८२ तक्रारी दाखल
------------------------------------
भरोसा सेल
मार्च ते सप्टेंबर २०२०
दाखल तक्रारी - ७५७
तक्रारींचे निराकरण- ६६५
-----------------------------------
पीडितांना मिळाला आधार
घरगुती त्रासाला कंटाळून कंटाळून महिला व बालकल्याण विभाग तसेच भरोसा सेलकडे तक्रार करणाऱ्या महिलांना वैद्यकीय व कायदेशीर मदत देण्यात आली. काही महिलांना समुपदेशन केंद्रात पाठवून मानसिक आधार देण्यात आला. यातून अनेक महिलांचे संसार पुन्हा आनंदाने सुरू झाले आहेत.
-----------------------------------
-----------
कौटुंबिक हिंसाचाराबाबत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रार करणाऱ्या महिलांना गरजेनुसार तत्काळ वैद्यकीय व कायदेविषयक मदत केली जाते. यासाठी प्रत्येक तालुक्यात संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती आहे. गरज असेल तर महिलांना सखी केंद्रात पाठवून त्यांना मानसिक आधार दिला जातो.
- रवींद्र काकळीज, जिल्हा संरक्षण अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, अहमदनगर
फोटो ०३ डमी १,२, ३