राजूर : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला राजूर (ता. अकोले) येथील काही लोक गेले होते. यातील सहा जणांना आरोग्य यंत्रणेने होमक्वारंटाईन केले आहे. या पार्श्वभूमीवर राजूरला तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. अंत्ययात्रेला गेलेल्या आणखी काही लोकांचा तपास ग्रामपंचायतीने सुरू केला आहे. अंत्ययात्रेला गेलेल्या स्वत:हून पुढे यावे, अशी विनंती राजूरचे सरपंच गणपतराव देशमुख यांनी केले आहे. राजूर येथील काही लोक ५ तारखेला व ७ तारखेला कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेस गेले होते. याची माहिती समजताच राजूर ग्रामपंचायतीने अकोले तहसीलदारांनी दिली आहे. खबरदारी म्हणून शनिवार ते सोमवार या तीन दिवस राजूर गाव बंद ठेवण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले. या बरोबरच गावातील ज्या व्यक्ती धांदरफळ येथे गेले होते. त्यांनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती द्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे. दरम्यान, पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि सरपंच देशमुख आणि स्थानिक कमेटीनेही पावले उच्चलली आहेत.मात्र अद्याप याबाबत निश्चित किती व्यक्ती गेल्याचे स्पष्ट झालेले नाही?
कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला गेलेल्या राजूरच्या सहा जणांना केले होमक्वारंटाईन; राजूरला तीन दिवस बंद; इतरांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 11:05 AM