केडगाव : लसीकरण केंद्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
जेऊर (ता.नगर) येथे कोरोना व लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. तनपुरे यांनी कोरोना लसीकरणाच्या वेळेस गर्दी होणार नाही. योग्य नियोजन करून लसीकरण प्रक्रिया पार पाडण्यात यावी जेणेकरून लसीकरण केंद्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनणार नाहीत, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तू डोकडे यांनी जेऊर कोविड सेंटरला ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे, अमोल जाधव, केशव बेरड, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले आदी उपस्थित होते.