अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात ३०७ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७५१ एवढी झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्ह्यात शनिवारी ३३१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ३१४ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७४ टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९७ आणि अँटीजेन चाचणीत १८२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (६०), नगर ग्रामीण (१२), नेवासा (३४), राहुरी (१६), शेवगाव (९), श्रीगोंदा (१३), कँटोन्मेंट (२), मिलिटरी हॉस्पिटल (४), अकोले (१२), जामखेड (१०), कर्जत (७), पारनेर (२५), पाथर्डी (१५), राहाता (१७), संगमनेर (२८), श्रीरामपूर (२२), कोपरगाव (२०).