अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी १९७ जण कोरोनाबाधित आढळले, तर २२४ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या १५३० जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये गुरुवारी ६८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४५ आणि अँटिजन चाचणीत ८४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (५५), अकोले (६), कर्जत (१४), कोपरगाव (१४), नगर ग्रामीण (१६), नेवासा (११), पारनेर (४), पाथर्डी (१६), श्रीगोंदा (५), श्रीरामपूर (४), जामखेड (५), राहाता (६), राहुरी (८), संगमनेर (२०), शेवगाव (१०), कन्टोनमेंट (१०) येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ६५ हजार ८०६ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६३ हजार ३०५ इतकी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९७१ जणांचा मृत्यू झाला आहे.