दैवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथे पिंपळगाव पिसा आरोग्य केंद्राकडून ३६० जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
सरपंच जयवंत भोसले व उपसरपंच मनीषा शिंदे यांच्या हस्ते लसीकरणाला प्रारंभ झाला. सकाळपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या या गावांकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष असते. परंतु, शनिवारी गावात लस उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. फ्रंटलाईन वर्कर म्हणून शिक्षकांनी काम पाहिले, तर शिबिर यशस्वीतेसाठी सुनील वाखारे, धनंजय वाखारे, दत्ता वाखारे, संतोष टिळेकर, ज्ञानदेव शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.
पिंपळगाव पिसा आरोग्य केंद्राचे डॉ. पठाण, प्रशांत सहस्त्रबुद्धे, आरोग्य सेविका जे. पी. पवार, ए. बी. मोरे, शिवाजी गायकवाड, पोपट दिवटे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कंदलकर यांनी लसीकरणाची जबाबदारी पार पाडली.
210821\img-20210821-wa0021.jpg
हिंगणी येथील ३६० नागरीकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले . ( छाया - संदीप घावटे )