देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आरोग्य विभागाच्या वतीने ८० जणांचे लसीकरण करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, राजापूरच्या सरपंच प्रतीक्षा मेंगवडे यांच्या हस्ते झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी ८० लसींचे डोस उपलब्ध करून दिले. डॉ. पूजा लोखंडे, डॉ. दादा पवार, आरोग्यसेविका सविता शिंदे आदींनी लाभार्थ्यांना लस देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. केंद्रप्रमुख रवींद्र शहाणे यांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे सर्वतोपरी सहकार्य केले. त्याबद्दल उपसरपंच छाया गव्हाणे यांनी आभार मानले.
याप्रसंगी यावेळी उद्योजक अतुल लोखंडे, माजी नगरसेवक माऊली कळमकर, माजी सरपंच संतोष शिंदे, ग्रा.पं. सदस्य दिलीप थेउरकर, उत्तम शिंदे, रावसाहेब दरेकर, उद्योजक आशिष थेउरकर आदी उपस्थित होते.