केडगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र वाळकी व उपकेंद्र गुंडेगाव यांनी नागरिकांना योग्य सुविधा मिळावी यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन गुंडेगाव (ता. नगर) येथील श्री रामेश्वर मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील ५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
पुढील काळात गुंडेगाव उपकेंद्रामार्फत गावातील प्रत्येक नागरिकांना लवकरच लस उपलब्ध करून दिली जाईल, असे उपसरपंच संतोष भापकर यांनी सांगितले.
याप्रसंगी वाळकी येथील आरोग्य अधिकारी डॉ. शैलेजा ठाकूर, डॉ. सोनाली चव्हाण, डॉ. प्रणाली पोटे, पी. एन. अंकाराम, ए. एस. कोतकर, विलास दाताळ आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी गावातील जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतकर, सुनील भापकर, संतोष सकट, महादेव चौधरी, संजय भापकर, शिवनाथ कोतकर, राजेंद्र मोहिते, संदीप जाधव, दादासाहेब आगळे, माऊली कुताळ, ज्ञानेश्वर हराळ, यश चौधरी आदी उपस्थित होते.
---
२८ गुंडेगाव