संदीप घावटे लोकमत न्यूज नेटवर्कदेवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील चेकनाक्यावर तैनात असणाºया पोलीस बांधवांनी भयानक ‘निसर्ग’ वादळ वाºयातही आपले कर्तव्य बजावताना हे कोरोनायोद्धे मागे हटले नाहीत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदीचा आदेश लागू आहे. गेल्या अडीच तीन महिन्यापासून बेलवंडी पोलीस व शिरूर पोलीस या चेकनाक्यावर तैनात आहेत. भर उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेत खडा पहारा या जिल्हा हद्दीवर देण्याचे काम त्यांनी केले.सध्या निसर्ग वादळामुळे पाऊस, वादळ, गारवा या नैसर्गिक आपत्तीतही हे कोरोना योद्धे जिल्हयात विनापरवानगी प्रवेश रोखण्यास सतर्क आहेत. वादळ वाºयातही अनेक प्रवासी वाहनांची वर्दळ नगर-पुणे महामार्गावर सुरू आहे. यावेळी या ‘निसर्ग’ संकटात कुठलीही विश्रांती न घेता जिल्हयात येणाºया पाहूण्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक वाहनांची कडक तपासणी पोलीसांकडून केली जात होती. बुधवारी दिवसभर वादळ व पाऊस यामुळे दूभाजकावर निवाºयासाठी बनवलेला तात्पुरता मंडप वादळात फाटून गेला. त्यामुळे पोलीसांच्या अडचणीत भरच पडली आहे. कोरोना महामारी व निसर्ग वादळ अशा दुहेरी संकटात समाजासाठी हे पोलीस बांधव सेवा देत कर्तव्य बजावत आहेत.कर्जतचे पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, कर्जतचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक बोºहाडे, सुपा येथील पोलीस उपनिरीक्षक कोसे हे आपल्या पोलिसांसह वादळवाºयात चोख बंदोबस्त ठेवत आहेत.--या गव्हाणेवाडी चेक नाक्यावर एक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी यांच्यासह चार होमगार्ड, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांचेही कर्मचारी पाऊस, वादळ वाºयात कर्तव्य बजावत आहेत. पावसापासून सरंक्षणासाठी पक्का निवारा, रेनकोट सध्या आवश्यक आहेत. याची वरीष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे. --फोटो-०४ चेक नाकागव्हाणेवाडी येथे चेक नाक्यावर पाऊस ,वादळ वाºयातही वाहनांची कडक तपासणी करत पोलीस दलातील कोरोना योद्धे मागे हटले नाहीत.