छत्रपती संभाजी राजे यांचे तैलचित्र ब्रिटिश लायब्ररीत (लंडन) असून १९८६ साली प्रकाशित इंडियन बुक पेंटिंग्ज या पुस्तकातही हे तैलचित्र छापण्यात आले होते. त्यात चित्राचे साल १६९० दिले आहे.
असे हे वैशिष्ट्यपूर्ण लचित्र देऊन डॉ. प्रशांत पटारे, कर्करोग तज्ञ डॉ. सतीश सोनवणे, नगरसेवक डाॅ. सागर बोरुडे, डॉ. शिवराज गुंजाळ, पुणे विद्यापीठ उपकेंद्र प्रमुख डॉ. नंदकुमार सोमवंशी, रचना कला महाविद्यालयाचे संचालक प्रशांतराव शेकटकर, न्यू आर्टस् महाविद्यालयाचे डॉ. अमन बगाडे, मुकुंदनगर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता बनकर, भाजीपाला व्यावसायिक नंदकुमार बोरूडे, टाकळी खातगावचे तरुण कबड्डी प्रशिक्षक सचिन नरवडे आदींचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय संघटनेचे राज्यात ६८ सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनाही हे तैलचित्र भेट देण्यात येईल.
संघटनेच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणारी बैलगाडी मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी १२५ वर्षे जुन्या शिवाजी मंदिरात संघटन पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी सांगितले.