नातेवाईकांकडून नगर अमरधाम येथे फोन करुन अंत्यसंस्कार संदर्भात विचारपूस केली. स्थानिक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमीत आपण अंत्यविधी करावा, असा सल्ला त्यास मिळाला. त्याप्रमाणे रुग्णाच्या नातेवाईकांनी चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालय प्रशासनास संपर्क करून त्यांना याबाबत कल्पना दिली.
ग्रामीण रुग्णालयाने चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीस पत्र देऊन आपण या मृतदेहाची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, असे सूचित केले.
नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकाटे, ग्रामविकास अधिकारी देविदास मोरे यांनी पुढाकार घेऊन अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य जमा करुन रुग्णांच्या नातेवाईकांस अंत्यविधी करण्यासाठी मदत केली. अंत्यविधी हिंदू संस्कृतीप्रमाणेच अगदी व्यवस्थित पार पाडण्यात आला. त्यासाठी पोलीस पाटील संतोष खराडे, तलाठी संतोष गोळवे, कोतवाल अनिल डोखडे, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी सचिन तोडमल, सिद्धांत ठक्कर, अरुण भेग, ग्रामपंचायत कर्मचारी संजय गाडे, जितू गाडे, विष्णू भद्रे, राजू तनपुरे यांनी सहकार्य केले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांकडून ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे आभार मानण्यात आले.