अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ४८४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नगर शहरात फक्त १० जणांचा समावेश आहे. पारनेर, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिलेला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ६१० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. रुग्णसंख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६२२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४६ आणि अँटिजन चाचणीत २९१ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ५, अकोले ३, जामखेड ४, कर्जत ६, कोपरगाव २, नगर ग्रामीण ४, नेवासा १, राहुरी २, संगमनेर १३, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ४, अकोले ३, कर्जत ६, नगर ग्रामीण ६, नेवासा १६, पारनेर ७, पाथर्डी ५, राहाता ८, राहुरी १६, संगमनेर १७, शेवगाव १८, श्रीगोंदा २७, श्रीरामपूर ७ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत २९१ जण बाधित आढळून आले. त्यामध्ये नगर शहर १, अकोले १७, जामखेड १३, कर्जत ५, कोपरगाव १८, नगर ग्रामीण १६, नेवासा १०, पारनेर ८२, पाथर्डी १८, राहाता ७, राहुरी १८, संगमनेर ९, शेवगाव ३७, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ६ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
-----------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,६९,२८२
उपचार सुरू असलेले रुग्ण : २६२२
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५८०१
एकूण रुग्णसंख्या : २,७७,७०५