कोपरगाव : कोपरगावातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील १२ व्यक्तींना प्रशासनाने क्वॉरंटाईन केले आहे. कुटुंबातील ६ सदस्य तर इतर ६ असे एकूण १२ व्यक्ती या महिलेच्या संपर्कात आले होते. त्यातील कुटुंबीयासह १० व्यक्तींना रात्रीच नगर येथे पाठवण्यात आले तर उर्वरित दोन व्यक्तींना आज सकाळी नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. महिलेच्या अथवा कुटुंबाच्या अजून कोणी संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी सांगितले.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण कोपरगाव शहरात संचारबंदी लागू केली असून १४ एप्रिल पर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.