सचिन नन्नवरे/ मिरी : कर्नाटकात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या विद्यार्थ्यांनी मदतीच्या अपेक्षेने ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्या ट्विटची माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून सबंधित विद्यार्थ्यांना कर्नाटकात मदत पोहोचवून महाराष्ट्रात सुखरूप आणण्यास प्रयत्न केले.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथे देशातील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन कलबुर्गी येथील मध्यवर्ती विद्यापीठात शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने सुट्टी जाहीर करून वसतिगृह तत्काळ खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी शिकणाºया महाराष्ट्रातील सुमारे ३५विद्यार्थ्यांना तत्काळ घरी परतणे आवश्यक होते. परंतु तपासणी न करता प्रवास केल्यास संसर्ग होण्याची भीती असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे हे विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले होते. परंतु त्याच ठिकाणी शिक्षण घेणाºया केरळ राज्यातील विद्यार्थ्यांसाठी केरळ सरकारने पथक पाठवून तपासणी करून घेऊन जाण्यासाठी वाहने पाठवली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखील राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. त्यामुळे नागपूर येथील आशीर्वाद सत्यम या विद्यार्थ्याने ट्विटरवर पोस्ट करून महाराष्ट्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सदर पोस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांना टॅग करून माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांची केली तपासणीअखेर नगर येथील युवराज चव्हाण या युवकाने मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना माहिती दिली. तनपुरे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सूत्रे हलवून सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पाठवले. कर्नाटकात अडकलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करून विशेष वाहनांनी त्यांना सुखरूपपणे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणले. त्यानंतर राज्यातील नगर, वर्धा, नागपूर, पुणे, मुंबई, चंद्रपूर, सातारा, नांदेड व गडचिरोली जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच केले. त्यामुळे संकटकाळी मदत केल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांर्नी व त्यांच्या पालकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले.
कोरोनामुळे कर्नाटकात अडकलेल्या महाराष्ट्रातील ३५ विद्यार्थ्यांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 3:05 PM